आपपर ते नोळखती – संत निळोबाराय अभंग – १२६९
आपपर ते नोळखती ।
अवघाचि देखती विठ्ठल ॥१॥
पूर्ण होऊनि ठेलें काम ।
आत्माराम देह त्यांचा ॥२॥
विठ्ठल कानीं विठ्ठल घ्राणीं ।
विठ्ठल नयनीं मनामाजी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल अंगे ।
रंगले रंगे विठठलाच्या ॥४॥
आपपर ते नोळखती ।
अवघाचि देखती विठ्ठल ॥१॥
पूर्ण होऊनि ठेलें काम ।
आत्माराम देह त्यांचा ॥२॥
विठ्ठल कानीं विठ्ठल घ्राणीं ।
विठ्ठल नयनीं मनामाजी ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल अंगे ।
रंगले रंगे विठठलाच्या ॥४॥