आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी ॥१॥ काचोळी पाठी कण । भूस निकण मग दाणा ॥२॥ आधीं तंतु पाठी वस्त्र । कनका अलंकार रुप करी ॥३॥ निळा म्हणे भक्ताविण । कैंचे देवपण देवासी ॥४॥