आधीं भक्त पाठी देव – संत निळोबाराय अभंग – १२६८
आधीं भक्त पाठी देव ।
प्रगटे भाव देखोनी ॥१॥
काचोळी पाठी कण ।
भूस निकण मग दाणा ॥२॥
आधीं तंतु पाठी वस्त्र ।
कनका अलंकार रुप करी ॥३॥
निळा म्हणे भक्ताविण ।
कैंचे देवपण देवासी ॥४॥
आधीं भक्त पाठी देव ।
प्रगटे भाव देखोनी ॥१॥
काचोळी पाठी कण ।
भूस निकण मग दाणा ॥२॥
आधीं तंतु पाठी वस्त्र ।
कनका अलंकार रुप करी ॥३॥
निळा म्हणे भक्ताविण ।
कैंचे देवपण देवासी ॥४॥