आदि मग हे अनादि बोली । निशीनें प्रगटलीं सूर्यमहिमा ॥१॥ अर्थ याचा आणा चिता । मग विचारितां कळेल ॥२॥ कडूचि नसतां कैंचें गोड । उष्मेविण सुरवाड छायेचा ॥३॥ निळा म्हणे पुत्रेंविण । न शोभे बापण वायाणें ॥४॥