आदि मग हे अनादि बोली – संत निळोबाराय अभंग – १२६७
आदि मग हे अनादि बोली ।
निशीनें प्रगटलीं सूर्यमहिमा ॥१॥
अर्थ याचा आणा चिता ।
मग विचारितां कळेल ॥२॥
कडूचि नसतां कैंचें गोड ।
उष्मेविण सुरवाड छायेचा ॥३॥
निळा म्हणे पुत्रेंविण ।
न शोभे बापण वायाणें ॥४॥