आणिकही उदंड संतजन – संत निळोबाराय अभंग – १२६६

आणिकही उदंड संतजन – संत निळोबाराय अभंग – १२६६

आणिकही उदंड संतजन ।
राहिले व्यापून महीतळीं ॥१॥
नामेंचि पावन केलें दोषी ।
उध्दार आणिकांशीं करुनियां ॥२॥
गर्जती तेणें ब्रम्हानंदे ।
हरिनाम पदें आळविती ॥३॥
निळा म्हणे निमग्न झालें ।
हरिपदा पावलें हरिनामें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिकही उदंड संतजन – संत निळोबाराय अभंग – १२६६