आणिकातेंही विठ्ठल करिती । लागले संगती भाविक त्या ॥१॥ यांचा वारा लागेल ज्यासी । येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥ घडतां त्यांचें अवलोकन । होती पावन महा पापी ॥३॥ निळा म्हणे त्यांची भेटी । तेचि गांठी विठठलेचि ॥४॥