अहो ऐका भाविक – संत निळोबाराय अभंग – १२६४
अहो ऐका भाविक ।
संत आर्तक मुमुक्षु ते ॥१॥
शुध्दचर्या आचरण ।
हेंचि पूजन संताचें ॥२॥
नंलगे सांगावें मागावें ।
जाणती स्वभावें हदत ते ॥३॥
निळा म्हणे अकस्मात ।
भेटती संत भावशुध्दी ॥४॥
अहो ऐका भाविक ।
संत आर्तक मुमुक्षु ते ॥१॥
शुध्दचर्या आचरण ।
हेंचि पूजन संताचें ॥२॥
नंलगे सांगावें मागावें ।
जाणती स्वभावें हदत ते ॥३॥
निळा म्हणे अकस्मात ।
भेटती संत भावशुध्दी ॥४॥