अवलोकिलें कृपादृष्टीं – संत निळोबाराय अभंग – १२६३
अवलोकिलें कृपादृष्टीं ।
केली वृष्टी वचनामृतें ॥१॥
अंकुरले भावबीज ।
कारण निज अंतरीचें ॥२॥
संतांचि हे सहज स्थिती ।
आठव देती स्मरणाचा ॥३॥
निळा म्हणे धांवोनि येती ।
आणि उपदेशिती निज गुहा ॥४॥
अवलोकिलें कृपादृष्टीं ।
केली वृष्टी वचनामृतें ॥१॥
अंकुरले भावबीज ।
कारण निज अंतरीचें ॥२॥
संतांचि हे सहज स्थिती ।
आठव देती स्मरणाचा ॥३॥
निळा म्हणे धांवोनि येती ।
आणि उपदेशिती निज गुहा ॥४॥