अपार संत झाले क्षितीं ।
ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥
जे जे झाले हरिचे दास ।
करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥
दर्शनें मुक्ति आणिकां देती ।
उदंड पावन केल्या याती ॥३॥
निळा म्हणे सनकादिक ।
आदि करुनि अनामिक ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.