मग सांगे गडियां – संत निळोबाराय अभंग – १२६

मग सांगे गडियां – संत निळोबाराय अभंग – १२६


मग सांगे गडियां सुजाणां ।
जातां कावडीं हिरोनि आणा ।
काय करितो देवराणा ।
पाहों चरित्र देवांचे ॥१॥
सें सांगोनियां गडियांसी ।
प्रात:काळींचि हषिकेशी ।
जाऊनियां मार्गप्रदेशीं ।
रोखूनियां बैसला ॥२॥
तंव ते लोक सकळही ।
स्नानें करुनियां लवलाहीं ।
वस्त्रें अळंकार घालुनी देहीं ।
वादयें वाजवित सुस्वरें ॥३॥
करुनि सकळिकां आरोळी ।
चला चला म्हणती उतावेळीं ।
मग मिरवित कावडी कल्लोळीं ।
नाचविताचि चालिले ॥४॥
वाणी पढती इंद्रप्रतापें ।
ठांई ठांई नाचती पडपें ।
सोहळा देखोनियां तो गोप ।
म्हणती कृष्णा अवलोकीं ॥५॥
कैसा करीतुची हे गजर ।
आले अवघे नारीनर ।
तंव कृष्ण म्हणे रे निर्भर ।
होऊनि लुटा कावडी ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि ऐसें ।
गोपाळ चौताळले आवेशें ।
म्हणती आणारे कृष्ण परे ईशें ।
कवडी इकडोचि आणविल्या ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग सांगे गडियां – संत निळोबाराय अभंग – १२६