अर्थ जाणती अनुभवी । खूण ठावीं जयां ते ॥१॥ संतकृपेचि ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥२॥ कळे त्या खरें खोटें । धीट पाटे प्रासादिक ॥३॥ निळा म्हणे अंतरींचें । प्रेम साचें कीं लटिकें ॥४॥