अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥ अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥ वंदूनि आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥३॥ निळा म्हणे ठेऊनि उदकीं । कागदहि सेखीं कोरडया वह्या ॥४॥