भक्तांचिया घरा आला – संत निळोबाराय अभंग – १२५५
भक्तांचिया घरा आला ।
सुख विश्रांति पावला ॥१॥
उपकार ते वेळोवेळां ।
आठवि घननीळ सांवळा ॥२॥
नाहीं कळिकाळा हे भ्याले ।
अग्नि विष वांटूनि प्याले ॥३॥
निळा म्हणे आभारला ।
म्हणवी भक्तांचा अंकिला ॥४॥
भक्तांचिया घरा आला ।
सुख विश्रांति पावला ॥१॥
उपकार ते वेळोवेळां ।
आठवि घननीळ सांवळा ॥२॥
नाहीं कळिकाळा हे भ्याले ।
अग्नि विष वांटूनि प्याले ॥३॥
निळा म्हणे आभारला ।
म्हणवी भक्तांचा अंकिला ॥४॥