देवासी दासाचा कळवळा – संत निळोबाराय अभंग – १२५४
देवासी दासाचा कळवळा ।
माये बाळावरी जैसा ॥१॥
नेदी मोडों भूक तहान ।
करें कुरुवाळोनि स्तन पाजी ॥२॥
दिठावेल म्हणोनि प्राण ।
निंबलोण उतरी त्या ॥३॥
निळा म्हणे करोनी कोड ।
पाळी लाड प्रीतीनें ॥४॥
देवासी दासाचा कळवळा ।
माये बाळावरी जैसा ॥१॥
नेदी मोडों भूक तहान ।
करें कुरुवाळोनि स्तन पाजी ॥२॥
दिठावेल म्हणोनि प्राण ।
निंबलोण उतरी त्या ॥३॥
निळा म्हणे करोनी कोड ।
पाळी लाड प्रीतीनें ॥४॥