संतापाशीं आर्त याचें – संत निळोबाराय अभंग – १२५१
संतापाशीं आर्त याचें ।
सांगे जिवीचें निज गुज ॥१॥
उपदेशिला चतुरानन ।
तेंचि ब्रम्हज्ञान अनुवादें ॥२॥
उध्दवा आणि अर्जुनासी ।
सांगितलें संतांसी तें देत ॥३॥
निळा म्हणे भुलला भक्ति ।
वाढवी प्रीति यालागीं ॥४॥