सत्य भोळा देव कृपेचा सागर – संत निळोबाराय अभंग – १२५०

सत्य भोळा देव कृपेचा सागर – संत निळोबाराय अभंग – १२५०

सत्य भोळा देव कृपेचा सागर ।
न मोडी उत्तर संतआज्ञा ॥१॥
भाविकाची सेवा न म्हणे फार थोडी ।
स्वीकारी आवडी आपुलिये ॥२॥
अनन्य प्रीतीचें तुळसीपत्र जळ ।
मानी सर्वकाळ तृप्ती तेणें ॥३॥
निळा म्हणे त्याचा करी बहुमान ।
अनाथ म्हणऊन सांभाळी त्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सत्य भोळा देव कृपेचा सागर – संत निळोबाराय अभंग – १२५०