संत निळोबाराय अभंग

तंव आली वार्षिक – संत निळोबाराय अभंग – १२५

तंव आली वार्षिक – संत निळोबाराय अभंग – १२५


तंव आली वार्षिक यात्रा ।
करणें इंद्रपूजा सर्वत्रां ।
गोरसें काढुनी कावडी भरा ।
हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥
जाऊनियां पर्वतासी ।
सुरपती पुजावा प्रतिवरुषीं ।
जागोनियां त्याची दिवसासी ।
निदसुरियां देती आठव ॥२॥
म्हणती उच्छिष्ट न करावें गोरस ।
दूध दहीं तूप सायास ।
लोणी भरुनियां कावडीस ।
रंग लावावा घागरमाळा ॥३॥
ध्वजा कुंचे सिध्द करा ।
विदया लावूनियां अपारा ।
जावें परिवारेंसी सत्वरा ।
प्रात:काळीं देवपूजे ॥४॥
गोवर्धनीं सुररावो ।
पूजा इच्छी देखोलि भावो ।
यालागीं सकळही समुदावो ।
जावें आपुल्या कल्याणा ॥५॥
मेघा तोषोनि यावरी ।
इच्छिल्या ऐसी वृष्टि करी ।
तेणें पिकती घुमरी ।
आणि गोधनेंही दुभती ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि श्रवणीं ।
विस्मय मानी चक्रपाणी ।
म्हणे मज प्रत्यक्षा सांडुनी ।
कैंचा इंद्र आणियला ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तंव आली वार्षिक – संत निळोबाराय अभंग – १२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *