मागें ऐकिले पवाडे याचे – संत निळोबाराय अभंग – १२४९
मागें ऐकिले पवाडे याचे ।
आजीं ते साचे कळों आले ॥१॥
आपुलियाचि स्वानुभवा ।
आलें तेव्हां साच कळलें ॥२॥
आणुनी मोहरा संकट टाळी ।
गोणी दुष्काळीं दाणियाची ॥३॥
निळा म्हणे प्रयोजनीं ।
साहित्य घेउनी संपादिलें ॥४॥