मागें पुढे उभा राहे – संत निळोबाराय अभंग – १२४८
मागें पुढे उभा राहे ।
भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥
प्रेमासी दृष्टी लागेल झणें ।
उतरीं निंबलोण वरुनियां ॥२॥
पोटातुला परम प्रीती ।
आलिंगी श्रीपती हदयेंसी ॥३॥
निळा म्हणे करुणा बहुत ।
झाला या मोहित भक्तांसी ॥४॥