म्हणती कामारी – संत निळोबाराय अभंग – १२४७

म्हणती कामारी – संत निळोबाराय अभंग – १२४७

म्हणती कामारी ।
दास्य करी त्यांच्या व्दारीं ॥१॥
ऐसा भक्तांसीं भुलला ।
नाम गातां आतुडला ॥२॥
नेणें त्यांविण आणीक ।
शेषशायी वैकुंठलोक ॥३॥
निळा म्हणे नि:सीम भावें ।
भजले विके त्यांच्या नांवें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणती कामारी – संत निळोबाराय अभंग – १२४७