भाविकाची आवडी देवा – संत निळोबाराय अभंग – १२४६

भाविकाची आवडी देवा – संत निळोबाराय अभंग – १२४६


भाविकाची आवडी देवा ।
करी सेवा निज प्रीतीं ॥१॥
हिंडे तया मागें पुढें ।
नाशी कोडे सकळही ॥२॥
घरीं दारीं वसे हरी ।
विश्वंभरी भाव ज्या ॥३॥
निळा म्हणे संदेह नाहीं ।
भक्तां पाही यावरीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाविकाची आवडी देवा – संत निळोबाराय अभंग – १२४६