भक्तांचिये मनीं जैसें – संत निळोबाराय अभंग – १२४२
भक्तांचिये मनीं जैसें ।
करि हा तैसें वर्तन ॥१॥
नेदी होऊं आज्ञें भंग ।
वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥
स्तंभी पाचारितां हाके ।
होऊनी ठाके नरहरी ॥३॥
निळा म्हणे उभा व्दारीं ।
केला विटेवरी मग ठाके ॥४॥
भक्तांचिये मनीं जैसें ।
करि हा तैसें वर्तन ॥१॥
नेदी होऊं आज्ञें भंग ।
वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥
स्तंभी पाचारितां हाके ।
होऊनी ठाके नरहरी ॥३॥
निळा म्हणे उभा व्दारीं ।
केला विटेवरी मग ठाके ॥४॥