भक्ताचांचि वोरस देवा । धांवे सेवा करुं त्यांची ॥१॥ जें जें गोड वाटें मनीं । तें तें वदनीं भरीं तयां ॥२॥ अपूर्ण तेथें पूर्ण करी । पुरवी कामारी होउनी ॥३॥ निळा म्हणे रक्षी हेत । उभा तिष्ठत त्यांपाशीं ॥४॥