भक्ताचांचि वोरस देवा – संत निळोबाराय अभंग – १२३९
भक्ताचांचि वोरस देवा ।
धांवे सेवा करुं त्यांची ॥१॥
जें जें गोड वाटें मनीं ।
तें तें वदनीं भरीं तयां ॥२॥
अपूर्ण तेथें पूर्ण करी ।
पुरवी कामारी होउनी ॥३॥
निळा म्हणे रक्षी हेत ।
उभा तिष्ठत त्यांपाशीं ॥४॥