भक्त देव देवतार्चन – संत निळोबाराय अभंग – १२३५

भक्त देव देवतार्चन – संत निळोबाराय अभंग – १२३५

भक्त देव देवतार्चन ।
भक्त माझें पूजाध्यान ॥१॥
भक्ताविणें भजों कोणा ।
म्हणे वैकुंठीचा राणा ॥२॥
भक्त माझा विधि जप।
भक्तचि योग याग तप ॥३॥
निळा म्हणे भक्तावरी ।
ऐसी निष्ठा सांगे हरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त देव देवतार्चन – संत निळोबाराय अभंग – १२३५