भक्ताघरींचें करीन काम – संत निळोबाराय अभंग – १२३४
भक्ताघरींचें करीन काम ।
त्यांचेंच नाम वागवीन ॥१॥
भक्तरुपें विराजलों ।
स्थिरावलों ह्रदयीं त्यां ॥२॥
भक्तसुखें सुखावत ।
त्यांच्याचि क्रीडत देहसंगे ॥३॥
निळा म्हणे ऐसा देव ।
दाखवी प्रभाव आपुला ॥४॥