बरें जाणवलें मग – संत निळोबाराय अभंग – १२३०
बरें जाणवलें मग ।
करी येऊनियां लगबग ॥१॥
अवलोकुनी कृपादृष्टीं ।
धरी कवळूनियां पोटीं ॥२॥
वोरसली माहें ।
लावी स्तनीं पाजी पेहे ॥३॥
निळा म्हणे दुरी ।
नवजे बैसोनियां घरीं ॥४॥
बरें जाणवलें मग ।
करी येऊनियां लगबग ॥१॥
अवलोकुनी कृपादृष्टीं ।
धरी कवळूनियां पोटीं ॥२॥
वोरसली माहें ।
लावी स्तनीं पाजी पेहे ॥३॥
निळा म्हणे दुरी ।
नवजे बैसोनियां घरीं ॥४॥