परम विश्रांति पावली – संत निळोबाराय अभंग – १२२९

परम विश्रांति पावली – संत निळोबाराय अभंग – १२२९

परम विश्रांति पावली ।
अवघीं येणें सुखी केलीं ॥१॥
आवडी वंदिती पूजिती ।
दर्शना जे याच्या येती ॥२॥
नाम उच्चारिती वाचे ।
नित्य कोड करी त्यांचे ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठी ।
धरी रुपे अनंतकोटी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

परम विश्रांति पावली – संत निळोबाराय अभंग – १२२९