परम कृपेचा सागर – संत निळोबाराय अभंग – १२२८
परम कृपेचा सागर ।
भक्तवत्सल करुणाकर ॥१॥
ऐसीं वागवितो नांवें ।
भक्तिलागीं निजवैभवें ॥२॥
म्हणवी दासाचा अंकित ।
शरणागता शरणांगत ॥३॥
निळा म्हणे साचचि करी ।
न वजे पासुनी तया दुरी ॥४॥
परम कृपेचा सागर ।
भक्तवत्सल करुणाकर ॥१॥
ऐसीं वागवितो नांवें ।
भक्तिलागीं निजवैभवें ॥२॥
म्हणवी दासाचा अंकित ।
शरणागता शरणांगत ॥३॥
निळा म्हणे साचचि करी ।
न वजे पासुनी तया दुरी ॥४॥