संत निळोबाराय अभंग

निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं – संत निळोबाराय अभंग – १२२४

निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं – संत निळोबाराय अभंग – १२२४


निवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं ।
सोपानदेवा नामसंकीर्तनी ।
मुक्ताबाई निजमुक्तिस्थानीं ।
निजानंदीं गौरविलें ॥१॥
ज्ञानदेवा दिधली समाधी ।
नामदेवा स्थापिलें निजपदीं ॥
परसा भागवताची वाडनदी ।
सुस्नात केली कीर्तनें ॥२॥
वच्छरा आणि विसोबा खेंचर ।
कानुपात्रा मिराबाई परम सुंदर ।
अंतोबा नरहरी सोनार ।
चरणीं थारा दिधला त्या ॥३॥
गोरा सांवता कूर्मदास ।
सगुण स्वरुप भेटलें त्यास ।
नरसी मेहता पिपा भानुदास ।
केला वास त्यांच्या ह्रदयीं ॥४॥
एका जनार्दन स्वरुपस्थिती ।
जनजसवंताची परम प्रीति ।
कबिराचीं पुष्पें करुनी अंतीं ।
निजधामाप्रती पाठविलें ॥५॥
तुकयासी विमानीं वाहिलें ।
संतोबासी वैराग्यें न्हाणिले ।
निजस्थान पालखीं निजवलें ।
निजभुवनीं आपुलिये ॥६॥
निळा म्हणे आपुलीं बाळें ।
कडिये घेउनी पुरवी लळे ।
स्नेहाळु माउली कळवळे ।
प्रेम देउनी वाढवी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निनिवृत्तीनाथासीं ठेविलें उन्मनीं – संत निळोबाराय अभंग – १२२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *