संत निळोबाराय अभंग

नाहीं कोणा उपेक्षिलें – संत निळोबाराय अभंग – १२२१

नाहीं कोणा उपेक्षिलें – संत निळोबाराय अभंग – १२२१


नाहीं कोणा उपेक्षिलें ।
सकळां सन्मानें स्थापिलें ।
आपुलिये पदीं बैसविलें ।
देणे दिधलें अपार ॥१॥
चुळा एका दुधासाठीं ।
स्तवितांचि उपमन्यें जगजेठी ।
करुनियां क्षिराब्धीची वाटी ।
लाविली ओठी तयाचिये ॥२॥
बापा अंकीं बैसावया ।
ध्रुवानें स्तविलें विनवूनियां ।
निश्चळ पद त्यासी देऊनियां ।
अक्षयपदीं बैसविलें ॥३॥
सुदामदेव तो वरासाठी ।
आला मागावया व्दारके भेटी ।
त्यासी रचूनियां गोमटी ।
सुवर्ण नगरी समर्पिली ॥४॥
पक्षियासी पाचारिलें ।
तिये गणिकेशीं विमानीं वाहिलें ।
नका भेणें हांकारिलें ।
त्या गजेंद्रा नेलें निजधामा ॥५॥
बिभीषण भेटी धांवोनी आला ।
लंकेचें राज्य दिधलें त्याला ।
चिरंजीव करुनियां बैसविला ।
आपुला शरणांगत म्हणवुनी ॥६॥
पहा हो वनींची तें वनचरें ।
निळा म्हणे रिसें आणि वानरें ।
आलिंगुनियां रघुवीरें ।
आपलें पंगतीं जेवविलीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाहीं कोणा उपेक्षिलें – संत निळोबाराय अभंग – १२२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *