न पडे विसर – संत निळोबाराय अभंग – १२१९
न पडे विसर ।
याचा जया निरंतर ॥१॥
हाही न विसंबे तयासी ।
जवळीं राहे अहर्निशीं ॥२॥
चर्चा करिती याच्या गोष्टी ।
देव तया पाठींपोटीं ॥३॥
निळा म्हणे अन्नपान ।
तया पुरवी आच्छादन ॥४॥
न पडे विसर ।
याचा जया निरंतर ॥१॥
हाही न विसंबे तयासी ।
जवळीं राहे अहर्निशीं ॥२॥
चर्चा करिती याच्या गोष्टी ।
देव तया पाठींपोटीं ॥३॥
निळा म्हणे अन्नपान ।
तया पुरवी आच्छादन ॥४॥