संत निळोबाराय अभंग

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १२१८

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १२१८

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण ।
धरिला अभिमान त्याचा तुम्हीं ॥१॥
व्दारकेसी त्याच्या हुंडया भरियेल्या ।
शोभनासी नेल्या वस्त्रें पेटया ॥२॥
जनजसवंत रायराजेश्वर ।
केला त्याचा थोर बहुमान ॥३॥
निळा म्हणे कुवा कुल्‍लाल हरिभक्त ।
पीपा रजपुत प्रिय तुम्हां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नरसिंह मेहता गुजराथी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – १२१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *