धांवोनियां झोंबे कंठी – संत निळोबाराय अभंग – १२१७

धांवोनियां झोंबे कंठी – संत निळोबाराय अभंग – १२१७

धांवोनियां झोंबे कंठी ।
कृपादृष्टी अवलोकी ॥१॥
म्हणे श्रमलेती मर्गें येतां ।
बैसा आतां अविश्रम ॥२॥
घडीघडीं जिवींची मात ।
सांगे पुसे आर्त आवडीचें ॥३॥
निळा म्हणे कृपाघनें ।
बहुत मानें गौरविलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धांवोनियां झोंबे कंठी – संत निळोबाराय अभंग – १२१७