देवाधिदेव मुगुटमणी – संत निळोबाराय अभंग – १२१६
देवाधिदेव मुगुटमणी ।
करी टेहणी दासाघरीं ॥१॥
शीण त्या होऊं नेदी भाग ।
वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
शुभाशुभ त्याचीं कर्मे ।
वारुनी दुर्गमें सुखी करी ॥३॥
निळा म्हणे आपणासरी ।
करुनियां करी बहुमान ॥४॥
देवाधिदेव मुगुटमणी ।
करी टेहणी दासाघरीं ॥१॥
शीण त्या होऊं नेदी भाग ।
वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
शुभाशुभ त्याचीं कर्मे ।
वारुनी दुर्गमें सुखी करी ॥३॥
निळा म्हणे आपणासरी ।
करुनियां करी बहुमान ॥४॥