ज्याचा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – १२१३

ज्याचा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – १२१३

ज्याचा केला अंगिकार ।
न मानी भार त्याचा हा ॥१॥
चंद्रहास्य अर्जुनाचा ।
पुंडलिकाचा कैवारी ॥२॥
नामदेवा कबिरासी ।
वागवी सांवत्यासी निजअंकीं ॥३॥
निळा म्हणे एकनाथा ।
न विसंबे सर्वथा तुकयासी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्याचा केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – १२१३