जागे आपुल्या उचितावरी – संत निळोबाराय अभंग – १२१०
जागे आपुल्या उचितावरी ।
सावधान हरि सर्वदा ॥१॥
परि हा कळों नेदी भेद ।
वाटे प्रालब्ध फळ देतें ॥२॥
आसुमाई चिन्ह पडे दृष्टी ।
वाटे पोटीं नवल तेव्हां ॥३॥
निळा म्हणे ऐशिया परी ।
दासांचा करी प्रतिपक्ष ॥४॥