अंतर कोणा नेदी सहसा – संत निळोबाराय अभंग – १२०६
अंतर कोणा नेदी सहसा ।
आपुलिया दासां सांभाळी ॥१॥
परम कृपावंत हरी ।
नामोच्चारी प्रगट होय ॥२॥
यांची निष्ठा बाणली ज्यासी ।
कदाही त्यासी न विसंबे ॥३॥
निळा म्हणे जवळचि राहे ऐसा भक्त मोहें मोहितु ॥४॥
अंतर कोणा नेदी सहसा ।
आपुलिया दासां सांभाळी ॥१॥
परम कृपावंत हरी ।
नामोच्चारी प्रगट होय ॥२॥
यांची निष्ठा बाणली ज्यासी ।
कदाही त्यासी न विसंबे ॥३॥
निळा म्हणे जवळचि राहे ऐसा भक्त मोहें मोहितु ॥४॥