एकोबाची सेवा करी – संत निळोबाराय अभंग – १२०५
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरीं जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळशीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
करुनी सडासंमार्जन ।
पाळित वचन आज्ञेचें ॥३॥
निळा म्हणे यापरि हरी ।
विराजे घरीं दासांचे ॥४॥
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरीं जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळशीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
करुनी सडासंमार्जन ।
पाळित वचन आज्ञेचें ॥३॥
निळा म्हणे यापरि हरी ।
विराजे घरीं दासांचे ॥४॥