एकाचिया हुंडया भरी – संत निळोबाराय अभंग – १२०४
एकाचिया हुंडया भरी ।
एका दास्यत्व ॥१॥
एकाचीं हा पेरी शेतें ।
घरें हातें शाकारी ॥२॥
एकीं केलीं फेडी ऋणें ।
गोणिया दाणे एका घरीं ॥३॥
निळा म्हणे पुरला सर्वां ।
देखोनि भावा अंतरींच्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
एकाचिया हुंडया भरी – संत निळोबाराय अभंग – १२०४