आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ – संत निळोबाराय अभंग – १२००
आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ ।
न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं ॥१॥
नेदी लागों वारा कल्पनेचा तया ।
न वजे पासोनियां दुरी कोठें ॥२॥
ब्रम्हरस मुखीं घालीं नामामृत ।
नेदी तुटों आर्त आवडीचें ॥३॥
निळा म्हणे यासी भक्ताचा अभिमान ।
उभा म्हणऊन युगें जातां ॥४॥