अनुरागें भजती देवा – संत निळोबाराय अभंग – ११९७
अनुरागें भजती देवा ।
त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥
म्हणोनियां मागें पुढें ।
धांवे कोडें सांभाळी ॥२॥
भुके तानें करी चिंता ।
लागों नेदी त्या ऊनवारा ॥३॥
निळा म्हणे अंतरसाक्षी ।
सदा कैंपक्षी दासाचा ॥४॥