म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती ।
या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥
तुम्हीं धांवोनियां येतां वरावरी ।
पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥२॥
न साहे वियोग तुम्हां उभयतां ।
देवां आणि भक्तां एकवंकी ॥३॥
निळा म्हणे दोन्ही पिंड एक जीव ।
जाणती हा भाव निगमादिक ॥४॥