भिन्न दावूनियां एक – संत निळोबाराय अभंग – ११९५
भिन्न दावूनियां एक ।
एकीं भिन्नत्वाचें बीक ॥१॥
जेंवि बिंब प्रतिबिंब ।
दोन्हीं एकचि ते स्वंयभ ॥२॥
जैसी गोडी आणि गूळ ।
कापूर तोचि परिमळ ॥३॥
निळा म्हणे देवां भक्ता ।
निवडी कोण भिन्न आतां ॥४॥
भिन्न दावूनियां एक ।
एकीं भिन्नत्वाचें बीक ॥१॥
जेंवि बिंब प्रतिबिंब ।
दोन्हीं एकचि ते स्वंयभ ॥२॥
जैसी गोडी आणि गूळ ।
कापूर तोचि परिमळ ॥३॥
निळा म्हणे देवां भक्ता ।
निवडी कोण भिन्न आतां ॥४॥