भक्तीं देवातें पूजिलें – संत निळोबाराय अभंग – ११९४

भक्तीं देवातें पूजिलें – संत निळोबाराय अभंग – ११९४


भक्तीं देवातें पूजिलें ।
देवें भक्तां सन्मानिलें ॥१॥
ऐसें भजती येरयेरां ।
जैसें जळ आणि जळगारा ॥२॥
भक्त देवाजवळी बैसे ।
देव भक्तां घरी वसे ॥३॥
निळा म्हणे देवा भक्तां ।
सर्वकाळीं एकात्मता ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तीं देवातें पूजिलें – संत निळोबाराय अभंग – ११९४