देवामाजीं भक्त असे – संत निळोबाराय अभंग – ११९२
भक्त् देवालागीं झुरे ।
देव भक्तातेंचि स्मरे ॥१॥
जेंवि माउलियेतें बाळ ।
माय बाळातें स्नेहाळ ॥२॥
येरेयेरां नव्हती भिन्न ।
सर्वकाळीं सन्निधान ॥३॥
निळा म्हणें लवणा नीरा ।
जेवि सोनें अळंकारा ॥४॥
भक्त् देवालागीं झुरे ।
देव भक्तातेंचि स्मरे ॥१॥
जेंवि माउलियेतें बाळ ।
माय बाळातें स्नेहाळ ॥२॥
येरेयेरां नव्हती भिन्न ।
सर्वकाळीं सन्निधान ॥३॥
निळा म्हणें लवणा नीरा ।
जेवि सोनें अळंकारा ॥४॥