देवामाजीं भक्त असे – संत निळोबाराय अभंग – ११९१
देवामाजीं भक्त असे ।
भक्ता अंगीं देव दिसे ॥१॥
ऐशी परस्पंरे मिळणी ।
जेवीं प्रभा आणि तरणी ॥२॥
भक्त देवातेंचि भजती ।
देवें भक्तीं ठेविली प्रीती ॥३॥
निळा म्हणें एकवंकीं ।
जैसा अळंकार कनकीं ॥४॥
देवामाजीं भक्त असे ।
भक्ता अंगीं देव दिसे ॥१॥
ऐशी परस्पंरे मिळणी ।
जेवीं प्रभा आणि तरणी ॥२॥
भक्त देवातेंचि भजती ।
देवें भक्तीं ठेविली प्रीती ॥३॥
निळा म्हणें एकवंकीं ।
जैसा अळंकार कनकीं ॥४॥