सोडुनी तया न वचे दुरी – संत निळोबाराय अभंग – ११८८

सोडुनी तया न वचे दुरी – संत निळोबाराय अभंग – ११८८

सोडुनी तया न वचे दुरी ।
त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥
म्हणे मी त्यांचा तेही माझे ।
नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥
मी तूं म्हणतां वेगळे न हों ।
मुळींचे आहों एकाएकीं ॥३।
निळा म्हणे देवभक्तां ।
एकात्मता ठायींची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सोडुनी तया न वचे दुरी – संत निळोबाराय अभंग – ११८८