देव तोचि भक्त नाहीं वेगळीक – संत निळोबाराय अभंग – ११८७

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक – संत निळोबाराय अभंग – ११८७

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक ।
जल गार उदक जयापरि ॥१॥
येरयेरामाजिं येकपणीं भिन्न ।
करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥
सौरभ्य चंदन परिमळ सुमन ।
नव्हति ते भिन्न्‍ येक येका ॥३॥
निळा म्हणे रत्ना जेंवि रत्न कीळ ।
दोंनावी निर्मळ एकी शिळा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक – संत निळोबाराय अभंग – ११८७